🏡 नांदगाव गावाची माहिती

📜 गावाचा इतिहास

नांदगाव , ग्रामपंचायत ही रायगड जिल्हा परिषद, मुरुड पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या ४३४४ असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव नांदगाव ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये नांदगावसह दांडे तर्फे नांदगाव, आडी पांगाळे, आणि सरणे या गावांचा समावेश आहे. रायगड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे.

नांदगाव , तालुका मुरुड, जिल्हा रायगड नांदगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय अलिबाग पासून सुमारे ४० किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय मुरुड पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या नांदगाव हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे. पोस्टल सेवा: नांदगाव गावाचा पिन कोड ४०२४०१ आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा नांदगाव पोस्ट ऑफिस द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे काशीद ( kashid ), कोर्लई (korlai), सालाव (salav), मजगाव (mazgaon), विहूर (Vihur) जवळची मोठी शहरे: नांदगाव गावापासून मुरुड , अलिबाग , रोहा आणि श्रीवर्धन ही मोठी शहरे जवळ आहेत.

लोकजीवन माहिती

जीवनशैली : सादगीपूर्ण जीवन: येथील लोक निसर्गाच्या सानिध्यात, साधे आणि सरळ जीवन जगतात. त्यांची जीवनशैली पायाभूत गरजांवर आधारित आहे. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था: या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व बागायत आहे. भात, वाल, चवळी, नारळ, सुपारी यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. परंतु आता आंबा, चिकू, पेरू, फणस व इतर हंगामी पिके व पालेभाज्या या पिकानीही आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणली आहे. परंपरा आणि चालीरिती: नांदगाव ग्राम पंचायत हद्दीमध्ये विविध जाती-पोटजाती धर्माचे लोक राहतात. यामध्ये हिंदू, मुस्लीम, बौद्ध, काही अंशतः जैन व पारसी धार्मिक वस्तीचा समावेश आहे. त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट परंपरा, सण-उत्सव आणि चालीरिती आहेत. तसेच प्रत्येक समाजाचे समाजबांधव त्यांच्या पारंपारिक पद्धतीने परंतु एकोप्याने सण उत्सव साजरे करतात. उदा .नवरात्र उत्सव ,होळी ,गणपती उत्सव, व स्थानिक यात्रा-उत्सव साजरा केले जातात. घरांची रचना : नांदगाव हे गाव ग्रामीण भागात असले तरी तालुक्यापासून नजीक असल्याने व पर्यटन व्यवसाय चांगल्या प्रमाणात होत असल्याने येथील येथील मुख्य प्रवाहातील वसाहतीतील घरे हि सिमेंट विटांची पक्की घरे आहेत. तसेच काही भागांमध्ये कौलारू घरे आजही गावाचे गावपण जपताना दिसतात. आदिवासी वसाहतींमध्ये झोपड्या काही प्रमाणात असल्यातरी शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी होत असल्याने त्यांचे राहणीमानही सुधारताना दिसत आहे. सामाजिक जीवन: एकसंघ समाज : ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव हद्दीमध्ये असणाऱ्या मौजे नांदगाव, मौजे आडी-पांगाळे, मौजे दांडे तर्फे नांदगाव व मौजे सरणे या महसुली गावांचा समावेश आहे.येथे विविध जाती - पोटजाती व धर्माचे लोक राहतात. परंतु वैविध्य असूनही त्यांमध्ये जपलेला बंधुभाव व एकोपा हे ग्रामपंचायत नांदगावचे वैशिष्ट्य आहे. येथिल वस्तीमध्ये हिंदू (माळी, कोळी, भंडारी, आगरी, लोहार, कुंभार, कुणबी, ब्राम्हण, सी.के.पी., सोनार इ. जाती) (महादेव कोळी, आदिवासी इ. अनुसूचित जमाती), मुस्लीम, बौद्ध, जैन - पारसी इ. स्थानिक वसाहत असून, व्यवसायानिमित्त परराज्यातील अनेक लोक येथे स्थायिक झालेले आढळतात. प्रत्येक धर्म-जातीचे आपले वेगळेपण असून देखील येथे शांतता व सुव्यवस्था आढळून येते. शिक्षण : ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव मध्ये एकूण पाच माध्यमिक शाळा व सहा अंगणवाड्यांचा समावेश आहे. गावातील सर्व समाज घटक शिक्षणाचा लाभ घेत आहेत याची दक्षता घेतली जाते. शिक्षणाबाबत जनजागृती व शिक्षणामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या शिक्षणार्थीना प्रोत्साहन देण्याचे कार्य ग्रामपंचायत नांदगाव द्वारे आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे केले जाते. आरोग्य : आरोग्य उपकेंद्र नांदगाव, तसेच गावात असणारे विविध खाजगी उपचार केंद्र यांमुळे प्राथमिक आरोग्य सेवा ह्या तत्काळ उपलब्ध होतात. आरोग्य शिबिरे व जनजागृती राबविली जातात. तसेच परिचारिका व आशा सेविका यांच्या सहाय्याने काही दुर्गम भागांपर्यंत प्राथमिक उपचार पोहोचवणे शक्य होत आहे.

मुख्य पिके

भात (Paddy): पावसाळ्यात भात हे एक महत्त्वाचे पीक आहे. वाल (Wal), चवळी (Chavli ) ही कडधान्ये देखील या परिसरात घेतली जातात. आंबा (Mango): काही ठिकाणी आंब्याचे पीक घेतले जाते तसेच हंगामी फळ उत्पादन घेतले जाते परंतु अवकाळी पावसामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. नारळ, सुपारी चे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते हंगामी पालेभाज्या व फुले यांचे पिक घेतले जाते

प्रेक्षणीय स्थळे माहिती

नांदगाव हे फणसाड अभयारण्य व समुद्र किनारा यांच्या मधोमध वसलेले गाव आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात केला जातो. येथील नैसर्गिक सौंदर्य व इतिहासातील त्याचे महत्व गावाला एक वेगळी ओळख घडवून देतो. धार्मिक स्थळे: गावाचे ग्रामदैवत असणारे सिद्धीविनायक मंदिर हि गावाची महत्वाची खुण आहे. अनेक भाविक येथे दर्शनाकरिता येतात. तसेच गावामधील विविध वस्त्यांमध्ये त्यांचे दैवत पूजले जातात. यामध्ये वाघोबा मंदिर, तिर्थवणे, नागोबा मंदिर यांसारख्या स्थानिक धार्मिक स्थळांचा समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्य: गावाच्या एका सीमेला हिरवागार पसरलेले फणसाड अभयारण्य व दुसऱ्या सीमेला अथांग पसरलेला समुद्र यांमुळे नांदगावचे सौदर्य अधिक उठून दिसते. समुद्र किनारा मच्छीमारी व पोहाणी करिता सुरक्षित आहे. अभयारण्यात विविध जैवविविधता आढळून येते.

ग्रामपंचायत यशोगाथा माहिती

पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण: अनेक ग्रामपंचायतींनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहीर पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारण प्रकल्पांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. स्वच्छता अभियान: गावातील स्वच्छता राखण्यासाठी प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयांची निर्मिती आणि जनजागृती मोहीम राबवून यश मिळवले आहे. सौरऊर्जेचा वापर: काही ग्रामपंचायतींनी सार्वजनिक दिवे आणि पाण्याच्या पंपासाठी सौरऊर्जेचा वापर करून वीज खर्चात बचत केली आहे. डिजिटल ग्राम: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतीचे व्यवहार ऑनलाइन करणे, करवसुली सुलभ करणे आणि नागरिकांना विविध सुविधा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून देणे. शिक्षण आणि आरोग्य सेवा: गावातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय करणे, अंगणवाड्यांमध्ये सुधारणा करणे आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून लोकांचे आरोग्यमान सुधारणे.

ग्रामपंचायत सौंदर्य माहिती

नांदगाव हे फणसाड अभयारण्य व समुद्र किनारा यांच्या मधोमध वसलेले गाव आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात केला जातो. येथील नैसर्गिक सौंदर्य व इतिहासातील त्याचे महत्व गावाला एक वेगळी ओळख घडवून देतो. धार्मिक स्थळे: गावाचे ग्रामदैवत असणारे सिद्धीविनायक मंदिर हि गावाची महत्वाची खुण आहे. अनेक भाविक येथे दर्शनाकरिता येतात. तसेच गावामधील विविध वस्त्यांमध्ये त्यांचे दैवत पूजले जातात. यामध्ये वाघोबा मंदिर, तिर्थवणे, नागोबा मंदिर यांसारख्या स्थानिक धार्मिक स्थळांचा समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्य: गावाच्या एका सीमेला हिरवागार पसरलेले फणसाड अभयारण्य व दुसऱ्या सीमेला अथांग पसरलेला समुद्र यांमुळे नांदगावचे सौदर्य अधिक उठून दिसते. समुद्र किनारा मच्छीमारी व पोहाणी करिता सुरक्षित आहे. अभयारण्यात विविध जैवविविधता आढळून येते.

पाणीपुरवठा नियमित
100% काँक्रिटिकृत रस्ते
दैनिक कचरा संकलन
विविध धर्माचे लोक एकत्र

ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

ग्रामपंचायतीचे नाव:
नांदगाव
स्थापना:
1958
Email ID:
grupgrampanchayatnandgaon@gmail.com
सेन्सस कोड:
402120
तालुक्यापासून अंतर:
10-12 कि.मी.
जिल्हा मुख्यालयापासून अंतर:
४० कि.मी.
स्वस्त धान्य दुकान:
1
प्राथमिक शाळा:
1 ते 7 जिल्हा परिषद शाळा
अंगणवाडी केंद्र:
६ आहेत परंतु ४ अंगणवाडी इमारती आहेत

लोकसंख्या

तपशील पुरुष स्त्रिया एकूण
एकुण लोकसंख्या 2127 2217 4344
Accessibility Options